Collector & District Magistrate

जिल्ह्यामध्ये आज भौतिक सोई सुविधा विकसित होण्याच्या दृष्टीने विविध विकास कामे कार्यान्वित आहेत. त्यांपैकी राष्ट्रीय महामार्ग ची कामे ह्या मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. सदर प्रक्रिया राष्ट्रीय महामार्ग कायदा १९५६ मधील विविध तरतुदी द्वारे राबवण्यात येतात. केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयामार्फत २८/१२/२०१७ च्या निर्देशान्वाये नवीन भूसंपादन कायद्याच्या जमिनीचे वाजवी मोबदला निश्चित करण्याची तरतुदी ह्या, राष्ट्रीय महामार्ग कायद्याला लागू करण्यात आलेल्या आहेत. एखादी व्यक्ती ज्याची जमीन नाशिक मधील विविध राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित करण्यात आली असेल (NH ३ व NH ५० वगळून) जी ह्या मोबदल्याला संमत नसेल किवा ज्याला प्राप्त मोबदला अत्यल्प वाटत असेल त्यांनी राष्ट्रीय महामार्ग कायद्यातील क ३ G (५) अन्वये तत्काळ निर्णयाकरिता लवादाकडे दाद मागता येते.


शेतकर्यांना तात्काळ न्याय मिळावा आणि वाजवी मोबदला मिळावा ह्या हेतूने रस्ते विकास परिवहन व राज महामार्ग मंत्रालय नवी दिल्ली मार्फत दि २५ एप्रिल २०२० रोजी प्रसिद्ध केलेल्या राजपत्राद्वारे जिल्हाधिकरी नाशिक ह्यांना नाशिक जिल्ह्यातील खालील नमूद महामार्गांसाठी लवाद म्हणून घोषित करण्यात आले आहे.

Gangatharan D (IAS)

जिल्हाधिकारी नाशिक तथा लवाद राष्ट्रीय महामार्ग नाशिक जिल्हा

अनु क्र प्रकल्पाचे नाव लवाद म्हणून अधिसूचित अधिकारी जिल्हा तालुके
1 राष्ट्रीय महामार्ग १६० ( सिन्नर- शिर्डी) जिल्हाधिकारी नाशिक नाशिक जिल्हातील संबंधित सर्व तालुके
2 राष्ट्रीय महामार्ग ९५३ ( वणी –पिंपळगाव बसवंत) जिल्हाधिकारी नाशिक नाशिक जिल्हातील संबंधित सर्व तालुके
3 राष्ट्रीय महामार्ग ८४८ ( नाशिक-पेठ- कापर्डा) जिल्हाधिकारी नाशिक नाशिक जिल्हातील संबंधित सर्व तालुके
4 राष्ट्रीय महामार्ग ७५३ जे (जळगाव- भडगाव-पाचोरा-चाळीसगाव-नांदगाव –मनमाड ) जिल्हाधिकारी नाशिक नाशिक जिल्हातील संबंधित सर्व तालुके
5 राष्ट्रीय महामार्ग १६०एच (दोंडाईचा-कुसुंबा-मालेगाव) जिल्हाधिकारी नाशिक नाशिक जिल्हातील संबंधित सर्व तालुके
6 राष्ट्रीय महामार्ग ७५२ जी (सटाणा-चांदवड-मनमाड) जिल्हाधिकारी नाशिक नाशिक जिल्हातील संबंधित सर्व तालुके
7 नवा राष्ट्रीय महामार्ग (सुरत-नाशिक अहमदनगर) जिल्हाधिकारी नाशिक नाशिक जिल्हातील संबंधित सर्व तालुके

उपरोक्त महामार्गातील बाधित शेतकऱ्यांना जलद न्याय मिळावा ह्यास्तव नाशिक जिल्हाधिकारी कार्यातील उपजिल्हाधिकारी (PALAQ) यांना प्रकरणे दाखल करून घेणे आणि सुनावणी चे बोर्ड सादर करणे करिता ह्या कार्यालयचे समन्वयक म्हणून घोषित करण्यात आले आहे.


कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळणे, न्यायदानाची प्रक्रिया जलद करणे , प्रक्रियेत पारदर्शक करणे आणि शासकीय दस्त एवजांचे योग्य रित्या हाताळणी ह्वावी ह्या साठी nashikearbitrator.in संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. माझी सर्व शेतकरी बांधव व विधिज्ञ मंडळीना सदर संकेतस्थळाच्य माध्यमाने प्रकरणे मुदतीत दाखल करणे, नमूद वेळेत आपले दस्त ऐवज सादर करणे तसेच अपील अर्जावर सुरु असलेली कार्यवाही तपासणे इ बाबी nashikearbitrator.in संकेतस्थळावरून करण्याचे आव्हान करण्यात येत आहे.

ABOUT DISTRICT

Nashik District is located between 18.33 degree and 20.53 degree North latitude and between 73.16 degree and 75.16 degree East Longitude at Northwest part of the Maharashtra state, at 565 meters above mean sea level. The District has great mythological background. Lord Rama lived in Panchvati during his vanvas. Agasti Rushi also stayed in Nashik for Tapasya.


The Godavari river originates from Trimbakeshwar in Nashik. One of the 12 Jyotirlingas also at Trimbakeshwar. Nashik has to its credit many well known and towering personalities like Veer Sawarkar, Anant Kanhere , Rev. Tilak, Dadasaheb Potnis, Babubhai Rathi, V.V. Shirwadkar and Vasant Kanetkar just name few.

Top